पिंपरी : मला कार्यक्रमाला बोलविण्याचे कारण काय? तर मी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आहे. आपले काही प्रश्न माझ्या हातात आहेत. त्यामुळे मला बोलावून, मोठेपण देऊन, आपली कामे करून घ्यायची. मलाही वाटेल द्राक्ष बागाईतदार संघ आपल्याला विसरला नाही. ही सगळी अंडीपिल्ले माहिती आहेत, अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने वाकड येथे आयोजित ६३ व्या तीन दिवसीय द्राक्ष परिषदेत पवार बोलत होते. बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत अजितदादांचा ‘वरचष्मा’, पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण
अजित पवार म्हणाले, तुम्ही बोलविले, मला बोलविण्याचे कारण काय, मी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आहे. आपले काही प्रश्न माझ्या हातात आहेत. त्यामुळे मला बोलावून, मोठेपण देऊन, आपली कामे काढून घ्यायची आणि मलाही वाटेल द्राक्ष बागाईतदार संघ आपल्याला विसरला नाही. ही सगळी अंडीपिल्ले माहिती आहेत. पण ठीक आहे. तुमच्या जागी मी असतो तरी हेच केले असते. शेवटी कामे ज्याच्या हातात आहे. त्याच्याकडूनच होणार आहेत. म्हणून तुम्ही मला बोलावून योग्यच केले आहे.
हेही वाचा >>>गणेश विसर्जनादिवशी पैगंबर जयंतीचा जुलूस न काढण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही. त्याबाबत बैठक घेऊ, होणारी कामे केली जातील. एखादे काम होणार नसल्यास स्पष्टपणे सांगेल. राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रश्न सोडविले जातील. केंद्र सरकारकडीलही प्रश्न सोडविले जातील. माझे सचिव आशिष शर्मा यांनी दिल्लीत काम केले आहे. त्यामुळे प्रश्न सोडविण्यात अडचण येणार नाही. आपल्या प्रश्नांबाबत सप्टेंबर महिन्यात बैठक घेतली जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला संघ काम करतो. द्राक्ष बागाईतदार संघाच्या सभा कुठे होत होत्या, कशा होत होत्या. हे माहिती आहे. आता काय लखलखाट आला आहे. अजून तर मागितलेले द्यायचे आहे. पण, हरकत नाही सर्वांनीच पुढे गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>“आज मधूनच हिंदीत का बोलत आहात?” अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांना हसू आवरेना; पण पुढच्याच क्षणी…
काही महाभाग असे जन्माला आले आहेत ते पाऊस पडणार की नाही सांगतात. पूर्वी विहीर खोदण्यासाठी पानाड्याला बोलविले जायचे आणि तो काठी फिरवून येथे पाणी आहे असे सांगायचा. तो सांगायचा आपण ऐकायचो आणि पाणी ठिपका लागायचा नाही.
ठरावीक भागात अजिबात पाणी नाही. मूर पाऊस, तळी, धरणे भरल्याशिवाय काही पाणी लागत नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच सरकारमध्ये गेलो आहे. आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना मदत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले.