सहा महिन्यापूर्वी राज्यात गद्दारी करून आलेल्या सरकारला घरी बसवण्याचं काम शिक्षकांनी केलं आहे. हे शिक्षक उद्याची पिढी घडविण्याच काम करतात. त्या निवडणुकीमधून सत्ताधारी आणि राज्यातील जनतेला एक संदेश गेला आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमधून आपल्या सर्वांची ताकद सत्ताधारी पक्षाला दाखवून द्यायची आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित प्रचारसभेत पवारांनी शिंदे फडणवीसांवर निशाणा साधला.

हेही वाचा- …अन् ‘त्या’ प्रकारावर अजित पवारांनी थेट हातच जोडले

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. यावेळी आमदार चेतन तुपे,आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित होते.

हेही वाचा- कसबा विधानसभा पोटनिवडणूक : अजित पवार यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

पवार म्हणाले की, निवडणुकीत एक जागा वगळता सगळ्या निवडणूक जिंकल्या आहेत. कट्टर भाजपा किंवा शिंदे गटाचा उमेदवार निवडून आलेला नाही. हे या सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ही निवडणूक महागाई बेरोजगारी त्यावर लढवली पाहिजे. भावनिक निवडणूक करायची काही गरज नाही.आशा घटना घडत असतात आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच ही निवडणुक बिनविरोध व्हावी. याकरीता सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे फ़ोन आले. त्यावर मी त्यांना विचारले याच दोन जागा बिनविरोध का? पंढरपूर, देगुलर, मुंबई निवडणूक झाली. मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झाली नाही. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वानाच असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “त्यांना..”

त्यांना जायचं होत म्हणून ते अस काही करत होते का?

आगोदरचे राज्यपालबद्दल घडल ते सर्वांनाच माहिती आहे. आपल्या महापुरुषांबद्दल आपल्याला अभिमान आहे. त्याच्याबद्दल बोलायच काम चाललं होतं. या विरोधात आम्ही सगळ्यांनी मुबंईत मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. तसेच त्यांना जायच होत म्हणून ते अस काही करत होते का? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. राज्यपाल पदाची पाहिल्यापासून परंपरा चालत आली आहे. नवीन राज्यपाल रमेश बैस सत्ताधारी आणि विरोधकांनाबरोबर घेऊन काम करावे, अशी अपेक्षा असून नव्याने आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांना पवारांनी शुभेच्छाही दिल्या.