पुणे : श्री सदस्यांच्या मृत्यूंबाबत सरकार आणि विविध माध्यमे, राजकीय पक्षांकडून तफावत येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पिंपरी महापालिका इमारतीचे अग्निशामक लेखा परीक्षण; पाच मॉलला नोटीस देणार

अजित पवार म्हणाले की, आतापर्यंतच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यांत यंदाच्या सोहळ्यात सर्वाधिक खर्च करण्यात आला. १५ ते १६ कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तरीदेखील पाणी मिळाले नाही, असे समोर येत आहे. यातील सत्यता समोर येण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यास सनदी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे संबंध असतात, परिणामी ते एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, त्यात दोषी आढळणाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करू.