उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याच्या मुद्द्यावर मुंढवाकर, पुणेकरांवर नाराजी व्यक्त करत धारेवर धरलं. कचरा रस्त्यावर टाकण्याचा प्रकार बंद न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. तशी कठोर भूमिका घेण्याची वेळ आणू नका, असा इशारा अजित पवार यांनी दिला. घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवालही अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, “जाताना बऱ्याच ठिकाणी कचरा रस्त्याच्या बाजूला टाकलेला दिसतो. मुंडवाकरांचं, पुणेकरांचं मला हे कळत नाही. हे आपलं शहर आहे. आपली मुलं लहानाची मोठी होणार आहेत. आपला घरातील रस्ता असा रस्त्यावर टाकण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? असा गलिच्छपणा का निर्माण करता? नियमाप्रमाणे का वागत नाही?”

Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”

“तुम्हाला तुमच्या भागात कचरा टाकण्यासाठी किती वाजता कचरा गाडी हवी आहे ते सांगा. कचरा गाडी तुमच्या सोयीप्रमाणे त्या वेळेत तुमच्या भागात पाठवली जाईल. परंतू स्वतःचं घर साफ करून कचरा रस्त्यावर टाकणं बरोबर नाही. त्याबाबत उद्या कठोर निर्णय घेऊन कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. अशी कठोर भूमिका घ्यायला लावू नका हे मी स्पष्टपणे लक्षात आणून देतो,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “खोटं सांगत नाही, कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो, त्यामुळे…”; अजित पवारांचा तरुणांना सल्ला

“कचऱ्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरतं. त्यातून रोगराई पसरते, डासांचा प्रादुर्भाव वाढतो,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“ओबीसी घटकांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे”

अजित पवार पुढे म्हणाले, “महापालिका मुदत संपली आहे. निवडणुका पुढे गेल्या आहेत. आता ओबीसी प्रश्न आहे, पण ओबीसी घटकांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मध्यप्रदेश धर्तीवर आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे न जाता कोर्टाच्या निर्णयाचं पालन करून लागू करण्याचा प्रयत्न करू.”

हेही वाचा : …म्हणून भाजपाने अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ‘त्या’ जागेवर शिंपडले गोमूत्र, पंचामृत

“मी वरवर बोलणारा कार्यकर्ता नाही, जे बोलतो ते करतोच”

“उद्याच्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी जे उमेदवार देतील ते मान्य असतील. मी वरवर बोलणारा कार्यकर्ता नाही, जे बोलतो ते मी करतोच. मला सांगा आता मी सोडून इकडे कोण आलं? विरोधी पक्षातील कोणी प्रश्न सोडवत आलं का? आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे, महिला, काही अनुभवी चेहरे देऊ, पण आशीर्वाद देण्याचं, निवडून देण्याचं काम तुमच्या हातात आहे. तो आशिर्वाद तुम्ही द्यावा,” असं आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केलं.