पुणे : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने मोठे यश मिळविले. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून फारसे यश न मिळालेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळाले.या निवडणुकीत २८८ जागांपैकी ५० जागाही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, हिंदुत्वाचा मुद्दा, याबरोबरच इतर योजनांमुळे महायुतीला हे यश मिळाले असल्याची टीका केली जात होती. राज्य सरकारची तिजोरी रिकामी करून केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना राबविण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. निवडणुका झाल्यानंतर या योजनेचे नियम बदलले जातील आणि हळूहळू या योजना बंद होतील, अशी भीतीही व्यक्त केली जात होती. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आम्ही दाखवण्यासाठी सरकारी तिजोरीतून योजनांच्या नावाखाली निधीची लूट सत्तेत असलेले राज्यकर्ते करत असल्याचे बोलले जात होते.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?

हेही वाचा…पुणे: तोतया डॉक्टरला न्यायालयाचा दणका, तोतयाला दोन वर्ष सक्तमजुरी

निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयावरून २१०० रुपये करण्याची घोषणा देखील केली होती. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर ही रक्कम पुढील काही महिन्यात वाढवून दिली जाईल, अशी हमी राज्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मागचे कारण स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी आढाव यांची भेट घेतली. आढाव यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पवार यांनी भूमिका मांडली. त्यानंतर माध्यमांची संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना आणल्याची कबुलीच त्यांनी दिली.

हेही वाचा…देशसेवेसाठी आव्हानात्मक मार्गांचा अवलंब करा – हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग

अजित पवार म्हणाले, पाच महिन्यांपूर्वी लोकसभेला आमचा पराभव झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि योजना आणली. सगळ्या राज्यांनी काही ना काही योजना आणल्या. कोणी पाणी, वीज मोफत दिली; तर कोणी प्रवास मोफत दिला. महिलांना मदत दिली, तर बिघडले कुठे? इतर राज्यांनी दिले, तर ते प्रलोभन नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ईव्हीएम मुळे पराभव झाला सिद्ध करून दाखवा

विधानसभेच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) फेरफार केल्याने पराभव झाला, असा आरोप करणाऱ्यांनी तो सिद्ध करून दाखवावा, अशा शब्दांत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले. संध्याकाळी मतदान वाढले, त्यामध्ये आमचा काय दोष, अशी विचारणाही त्यांनी केली.

आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे. मतदान यंत्रे, मतपत्रिका या गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्या बाबतीत निर्णय घेतलेले आहेत. ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे सिद्ध करून दाखवावे.लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून माझ्या उमेदवाराचा ४८ हजारांनी पराभव झाला. महाविकास आघाडीच्या ३१ जागा राज्यात निवडून आल्या. त्या वेळी ‘ईव्हीएम’वर कोणीही बोलले नाही. पाच महिन्यांनंतर त्याच बारामतीमध्ये एक लाखाच्या मताधिक्याने जिंकलो. हे जनमत आहे. ते पाच महिन्यांनी बदलले ते मान्य करायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.

मतदानाच्या दिवशी अखेरच्या दोन तासांत संध्याकाळी मतदान कसे वाढले, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. मतदान वाढले त्यात आमचा काय दोष? सगळ्यांना वाटते, बाळासाहेब थोरात कसे पडले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कसे पडले? आता पडले तर पडले, असेही ते म्हणाले.

Story img Loader