पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली होती. भोसरीतील चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केल्याने  अस्वस्थ झालेले भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खूप दिवसांनी बोलायला मिळत असल्याचे सांगत फडणवीस यांच्यामुळेच समाविष्ट गावांचा विकास झाला आहे. फडणवीस यांनी यापुढेही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष कायम ठेवावे अशी मागणी लांडगे यांनी परमेश्वराकडे केली.

पिंपरी-चिंचवड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बालेकिल्ला मानले जात होते. परंतु, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचा बालेकिल्ला उध्वस्त केला. महापालिकेवर एकहाती भाजपची सत्ता आणली. आमदार लांडगे यांनी ‘नको बारामती, नको भानामती’, ‘शहरातील निर्णय शहरातच होतील’ अशी फलकबाजी करत अजित पवार यांना तीव्र विरोध केला होता. आता अजित पवार हेच भाजपसोबत आले. उपमुख्यमंत्री होताच पवारांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत भोसरीत महापालिकेने केलेल्या खर्चावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केले. त्याचे पुढे काही झाले नाही. परंतु, आमदार लांडगे हे अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. त्यांचाही अजित पवार यांना विरोध दिसून आला.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना

हेही वाचा >>>सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची शरद पवार यांच्याकडून घोषणा

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कामाचे उद्घाटन, भूमिपूजन झाले. परंतु, आमदार महेश लांडगे यांच्या विरोधामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे भोसरीतील उद्घाटने झाली नव्हती. पवारांसोबतच्या कार्यक्रमाला येणेही आमदार लांडगे यांनी टाळले होते. अखेर शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते भोसरीतील प्रकल्पाचे उद्घाटन, भूमीपूजने झाली. परंतू, कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणे टाळले. त्यामुळे पवार यांनी भोसरीत प्रवेश नसल्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा >>>पुणे: राजकारणात नटसम्राट सारखे काहीजण वागत आहेत..पण, देवेंद्र फडणीवसांची फटकेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील लक्ष कमी केल्याचे दिसते.  त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्याला आमदार लांडगे यांनी मोकळी वाट करून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शहराचा विकास झाला. त्यांनी यापुढेही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष कायम ठेवावे अशी मागणी परमेश्वराकडे करतो, असे म्हणत आमदार महेंद्र लांडगे यांनी शहरात पूर्वीप्रमाणे लक्ष घालण्याची मागणी केली.

त्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासकामाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठी आमदार महेश लांडगे  सातत्याने माझ्या मागे लागले होते. पाठीमागे मी एकदा तारीख दिली. पण, रद्द केली. त्यामुळे ते फार नाराज झाले.मी नक्की येणार असा शब्द त्यांना दिला होता. त्यांचा स्वभाव भावनिक असून आमच्यासोबत भावनेने जुळले आहेत. त्यामुळे दोन कार्यक्रम कमी झाले तरी चालतील पण आमदार लांडगे यांचा कार्यक्रम आपल्याला केलाच पाहिजे असे मी माझ्या कार्यालयातील लोकांना सांगितले. भविष्यातही शहराचा, आमदार लांडगे यांच्या पाठीशी अतिशय मजबुतीने उभे राहण्याची ग्वाही दिली.