उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराची ताकद वाढली आहे. अजित पवार हे पालकमंत्री झाले असले तरी त्यांना भाजपाने अधिकारही द्यावेत त्यानंतरच अजित पवार हे काम करू शकतील, असं खोचक विधान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे.
हेही वाचा – अजित पवारांकडे पालकमंत्रिपद आल्याने बारणे, लांडगेंची कोंडी?
हेही वाचा – मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला?…उमेदवारांची चाचपणी सुरू
गेल्या पाच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. महानगरपालिकेत कोट्यावधींचा घोटाळा झालेला आहे. त्याची चौकशीदेखील अजित पवारांनी लावावी. व्यक्तिशः अजित पवारांना माझ्याकडून शुभेच्छा. अजित पवारांनी आता विकासाचे राजकारण करावे. वीस वर्षांपासून शहरात अनेक प्रलंबित प्रश्ने आहेत, ती मार्गे लावावीत. शहरातील अनधिकृत बांधकाम, पवना जलबंद प्रकल्प, रेडझोन, असे प्रश्न प्रलंबित आहेत, असे तुषार कामठे म्हणाले.