पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटामधील नेत्यांमध्ये मागील सहा महिन्याच्या कालावधीत आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.या सर्व घडामोडी दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज चौक ते खडी मशीन चौका दरम्यान येणार्‍या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.तर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाच्या बॉर्डरवर असलेल्या कामांची पाहणी अजित पवार यांनी केल्याने सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात अजित पवार यांनी अधिकच लक्ष घालण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली.त्या पाहणी दौर्‍याबाबत अजित पवार म्हणाले की,मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.कोणाच्या बॉर्डरवर आणि आतमध्ये काही नाही.सगळीकडे लक्ष देण हे माझ काम असल्याच सांगत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये रस्त्यांच्या कामाबाबत घोषणा केली होती.त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता अजित पवार म्हणाले की,आता पुन्हा मागच कशाला काढतो.मागच किती ही काढल तरी काही अडचणी असतात,त्यामुळे आता माघच फार काही काढू नकोस,असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची बाजू अजित पवार यांनी सावरून घेतल्याचे पाहण्यास मिळाले.

हेही वाचा >>>बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार

गर्दी झाली म्हणून विरोधकांना त्रास झाला का

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर येथील कार्यक्रमा दरम्यान भावूक झाल्याच पाहण्यास मिळाल.त्यावरून विरोधकानी टीका केली आहे.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, गर्दी झाली म्हणून विरोधकांना त्रास झाला का ? अशा शब्दात विरोधकांना त्यांनी टोला लगावत ते पुढे म्हणाले की, सोलापूर येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली.तसेच ते पण माणुस आहे.ज्या माणसात माणुसकी असते.तो भावूक होतो.तेथील घर पाहिल्यावर त्यांना देखील जुने दिवस आठवले,त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या कामाच भूमिपूजन केले आणि नागरिकांना घरे देण्यास देखील ते आले.त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे.३० हजार घरांपैकी १५ हजार घर देण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात घर देण्यात आली आहेत.त्या कामाच विरोधकानी कौतुक केले पाहिजे. अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना त्यांनी सुनावले.