लोकसत्ता प्रतिनिधी पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने संघटनेतील पदाधिका-यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. युवक संघटनेतील काही पदाधिका-यांमध्येही चलबिचल सुरु झाली असून काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांसह संघटनेतील पदाधिकारीही पवार गटात जाण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर वर्चस्व होते. गेली १५ वर्षे शहरातील सर्व निर्णय, महापालिकेत कोणाला कोणते पद द्यायचे, पक्ष संघटनेतील निर्णय पवारच घेत होते. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’तील फुटीनंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वारे बदलल्याने आणि राजकीय भवितव्यासाठी अनेकजण घरवापसीच्या तयारीत आहेत. चिंचवड आणि भोसरीला भाजपचे आमदार आहेत. ज्याचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ मिळण्याचे महायुतीचे प्राथमिक सूत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे चिंचवड, भोसरी मतदारसंघ भाजपकडे कायम राहील. परिणामी, विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता नसल्याने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. अशीच परिस्थिती चिंचवड विधानसभा मतदारसंघातही असल्याने विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले नाना काटे यांनाही राजकीय भवितव्याची चिंता सतावत आहे.

Anil Parab and Niranjan Davkhare
मुंबईत शिवसेना उबाठाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
prasad lad Ambadas Danve
“भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल
Ajit Pawar, NCP, Marathwada,
मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चलबिचल
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

हेही वाचा >>> पिंपरी : भाजपकडून अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, कोण आहेत गोरखे?

शहराध्यक्षच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील अनेक माजी नगरसेवक एकमेकांना दूरध्वनी करून चौकशी करू लागले आहेत. राजकीय भवितव्यासाठी माजी नगरसेवकांचा ‘तुतारी’कडे ओढा वाढू लागला आहे. दुसरीकडे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेची शहराची जबाबदारी सांभळलेले आणि प्रदेशवर कार्यरत असलेल्या दोन पदाधिका-यांनी आमदार रोहित पवार यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. हे पदाधिकारीही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ हाेण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> अल्पवयीन मुलाला जामीन मंजुरीच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात, कल्याणीनगर अपघात प्रकरण

दरम्यान, विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी राहते, हे पाहू आणि त्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी काहींची भूमिका आहे.

युवकच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीही पक्ष सोडणार नाही.

शेखर काटे, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस