लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. वेळप्रसंगी ते कार्यकर्त्यांशी हास्यविनोदही करत असतात. याचा अनुभव बारामतीकरांना आज घेता आला. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ स्पर्धेच्या शुभारंभाला उपमुख्यमंत्री पवार सहभागी झाले होते. यावेळी ३६० अँगलने अजितदादांचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर अजितदादांनी स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा-श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

उपमुख्यमंत्री पवार हे दर रविवारी बारामती दौऱ्यावर असतात. बारामतीतील विविध विकास कामांचा आढावा ते घेत असतात. तसेच कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यानुसार आज पवार हे बारामतीमध्ये आहेत. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बनवण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पवार यांचा ३६० अँगलने व्हिडिओ बनवण्यात आला.