पुणे : देशात निश्चलनीकरणानंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नकार दिल्यानंतर राज्यातील सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सुमारे १०१ कोटी रुपये अडकून पडले आहेत. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे या बँकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> एमपीएससीतर्फे २७४ पदांच्या भरतीची जाहिरात… अर्ज प्रक्रिया कधीपासून?

निश्चलनीकरणानंतर राज्यातील सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सुमारे १०१ कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) दैनंदिन व्यवहारातील जमा झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दिला होता. याबाबत बँकेने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी शहा यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह बँकांचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यातून मार्ग काढण्याबाबत शहा यांना विनंती करण्यात आली असल्याचे ‘पीडीसीसी’ बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.