चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी करणाऱ्या नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. काही वेळ चर्चा झाल्याचं समोर आलेल असून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

हेही वाचा – अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी कोणत्या मतदारसंघात आहेत या समस्या !

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीकडून नाना काटे यांच्यासह इतर काही जण तीव्र इच्छुक होते. परंतु, ऐनवेळी महायुतीकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर नाना काटे यांनी शरद पवार गटाकडून देखील उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार गटातून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली. अखेर नाना काटे यांनी महायुतीतून बंडखोरी करत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आज राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी अजित पवारांनी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भेटीनंतर नाना काटे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar met rebel nana kate efforts are underway to prevent rebellion in mahayuti kjp 91 ssb