पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीबरोबर, यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका केव्हा होणार, असा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असताना. अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.

Jagdish Muliks hopes increased after Pankaja Munde is given responsibility of three constituencies in Pune
मुंडेंकडे जबाबदारी अन् मुळीकांच्या आशा पल्लवीत! वडगावशेरीमध्ये महायुतीत चुरस
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”
With help of MLA Geeta Jain strategy to defeat BJP is being planned by cm Eknath Shinde
मीरा-भाईदरमध्ये मुख्यमंत्र्यांकडूनच भाजपची कोंडी
chairmanship of ladki bahin scheme review committee hand over to mlas of ruling party in thane district
लाडकी बहीण’ योजनेत सत्ताधारी आमदारांचीच वर्णी
Will work for Kisan Kathore in Vidhana Sabha says former minister Kapil Patil
“विधानसभेला किसन कथोरेंचे काम करणार”, माजी मंत्री कपिल पाटलांचा नरमाईचा सूर; “मागे कुणी काय केले ते गौण…”

हेही वाचा – मैदानात उतरा, जोरदार बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका… देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

हेही वाचा – “ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; देवेंद्र फडणवीसांची टीका; म्हणजे, “आज जे राजकारण सुरू आहे…”

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. त्यात अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आपण आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.