पुणे : “भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. ही फ्लेक्सबाजी अतिउत्साही कार्यकर्त्यांची आहे, पण लोकशाहीत १४५ चा आकडा पार पाडणारा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे त्याला महत्व देऊ नका”, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईतील फ्लेक्सवर स्पष्टीकरण दिले. ते पिंपरीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : चासकमान धरणाच्या कालव्याजवळ अफूची शेती; शेतकऱ्यावर गुन्हा

माजी राज्यपालांनी शंकेला जागा होईल असे बोलू नये. उद्धव ठाकरे यांना ट्रॅपमध्ये अडकवले असेल तर स्पष्ट नाव सांगावे, असेही पवार म्हणाले. माजी राज्यपालांना आमदार नियुक्तीच्या पत्रात धमकी दिली असेल तर त्यांनी ते स्वतः राज्यपाल असताना जाहीर करायला हवे होते. किंवा त्यांनी आता करायला हवे होते. सर्वांच्या वाचनात आले असते तर लोकांना कळले असते, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – मेट्रोचे बांधकाम साहित्य चोरणारा गजाआड

अजित पवार पुढे म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीवर बोलताना त्यांनी ८ ला शपथ झाली, तुम्ही पहाट कसे म्हणता, आता त्या घटनेला तीन वर्षे झाली आहेत. हजार दिवस पूर्ण झालेत, आता परत परत ते काढता, असही अजित पवार म्हणाले. आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून होत आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यावर बोलताना याबाबत मला माहिती नसल्याचे अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on cm post flex in mumbai kjp 91 ssb