अदाणी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन घेट घेतली. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे. तथापि, ही भेट पूर्वनियोजित होती, असं सांगितलं जात आहे.

या उभयतांमध्ये झालेल्या भेटीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवारांनी गौतम अदाणींची भेट घेतली, असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अजित पवारांनी रोखलं. म्हणाले, “एक मिनिट. शरद पवारांनी अदाणींची भेट घेतली नाही. तर शरद पवारांकडे अदाणी आले होते, अशी बातमी वाचली. भेटीसंदर्भात मला माहिती नाही.”

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार”, सुषमा अंधारेंच्या दाव्यावर उदय सामंत यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“मात्र, अदाणींवर अद्याप कोणताही आरोप सिद्ध झाल्याचं पाहण्यास आलं नाही. त्याबाबत समिती नेमण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही समिती नेमली आहे. समितीचा अहवाल समोर आल्यावर पुढील गोष्टी होतील,” असं अजित पवारांनी म्हटलं.

अमेरिकास्थित ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा अहवाल समोर आल्यानंतर उद्योजक गौतम अदाणी यांच्याविरुद्ध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अदाणी उद्योगसमूहातील कथित व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची आग्रही मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी लावून धरली होती. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होऊ शकले नव्हते.

हेही वाचा : “कोण संजय राऊत?”, भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न; नेमकं काय घडलं वाचा

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ‘जेपीसी’ऐवजी ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून होणं गरजेचं आहे, अशी भूमिका मांडली होती.