राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “चूक करणाऱ्याला अटक करत कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “सौरभ पिंपळकर नावाच्या ट्वीटर अकाउंटवर धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या ट्वीटरच्या बायोमध्ये भाजपाचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. पण, तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती नाही. विचारांची लढाई विचारांनी करू. प्रत्येकाला आपलं विचार आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे. त्याचा गैरवापर कशाला करायचा.”

हेही वाचा : “जर काही झालं, तर त्याची जबाबदारी गृह विभागाची असेल”, शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा इशारा!

“राज्यातील आणि राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकराचे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला आहे. मात्र, सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण आहे? कुणी हे करायला भाग पाडलं? त्याच्या मोबाईलवरून कोणाशी संपर्क झाला, हे कळलं पाहिजे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा…”, संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

“प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. पण, कारण नसताना इतर नेत्यांची बदनामी, चारित्र्यहनन आणि जनमाणसातील प्रतिमा मलिन करायची हे प्रकार वाढत आहेत. हे दुर्देवी असून, याचा धिक्कार करतो. पोलिसांनी कठोर कारवाई करत, चूक करणाऱ्याला अटक करावी,” असेही अजित पवारांनी म्हटलं.