पुणे प्रतिनिधी: ‘वर्षा’ या निवासस्थानावरील जेवणाचे बिल दोन कोटी ३८लाख रुपये आले होते. त्यावरून सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो, अशी भूमिका मांडत अजित पवार यांच्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपादरम्यान ‘वर्षा’ बंगल्यावरील चहापानावरील खर्चाला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कात्री लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सोन्याचा चहा पिता की काय? त्या वेळी मी म्हणालो तर मुख्यमंत्री म्हणाले होते, सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो. पण मला एकच वाटते की, जनतेचा पैसा असून तो व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. त्या पैशाची उधळपट्टी करू नका. वायफळ खर्च करू नका, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवारांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

मी नवनीत राणांच्या भूमिकेचं स्वागत करतो: अजित पवार

मागील वर्षभरापासून ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या दोघांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहेत. त्याच दरम्यान आता महाविकास आघाडीमार्फत राज्यभरात अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या जात आहे. त्या सभांवरून खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली जाईल, त्या ठिकाणी ‘हनुमान चालिसा’ म्हणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यावरून ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा- पुणे: सीईटी सेलच्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

त्याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, ही चांगली गोष्ट असून मी त्यांचे स्वागत करतो. आमचा ‘हनुमान चालिसा’ला कोणाचाच विरोध नाही. एप्रिल महिन्यामध्ये महावीर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी झाली. आता महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तसेच रमजानचा पवित्र महिना सुरू असून सर्वांना शुभेच्छा आहेत. तसेच त्या कामातून त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांना समाधान मिळून द्यायला तयार आहोत, असे सांगत खासदार नवनीत राणा यांना त्यांनी टोला लगावला.

आणखी वाचा- “देश धर्मानुसार चालला तर आपला पाकिस्तान होईल, कारण…”, संजय राऊतांचं मोठं विधान

राज्य सरकारमधील मंत्री आणि अन्य सहकारी मंडळी मास्क वापरताना दिसत नाहीत: अजित पवार

देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अशीच परिस्थिती राज्यातदेखील आहे. त्यावर राज्य सरकारकडूनही कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही.

त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याकडे आपण सर्व जण गांभीर्याने पाहत नसून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींनी तसेच त्या ठिकाणी कामानिमित्त जाणार्‍या नागरिकांनी मास्क घालूनच गेलेच पाहिजे. मात्र अद्यापपर्यंत आदेश काढले गेले नाहीत. तसेच राज्य सरकारमधील मंत्री आणि अन्य सहकारी मंडळी मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना करोनाचे एवढे काही गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे सध्या प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी लवकर भूमिका मांडावी, अशी मागणीदेखील त्यांनी या वेळी त्यांनी केली. त्यामुळे करोना रुग्णांची सध्याची परिस्थिती नागरिकांना समजण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली.

आणखी वाचा- Video: …आणि बगाड मधोमध तुटलं; पिंपरीतल्या पारंपरिक म्हातोबा देव यात्रेमधली घटना; कोणतीही जीवितहानी नाही!

मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विविध धार्मिकस्थळी जाण्यास नक्की आवडेल: अजित पवार

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे. तेथे अनेकांचे दौरे होत आहेत. तेथील काम कसे सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहावे वाटत नाही का? त्यावर अजित पवार म्हणाले की, मला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत त्या ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांवर नतमस्तक व्हावे वाटते. तेथील पाहणी करावी वाटते. पण माझ्याकडे सकाळपासून नागरिकांची गर्दी असते. त्यात तुम्ही माझा अर्धा तास घेत आहात, त्यामुळे वेळच मिळत नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विविध धार्मिक स्थळी जाण्यास नक्की आवडेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आशीष देशमुखांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही: अजित पवार

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार आशीष देशमुख राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार, असे चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, आशीष देशमुख यांच्याबाबत मला काही माहिती नाही. त्या संदर्भात कोणासोबतही बोलणे झाल नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील राजकारणात आल्यापासून कोण, कुठे जाणार याबाबतची लिस्ट काढल्यावर तुम्हालाच त्याची संख्या समजणार नाही, अशा शब्दात भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांनी टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar once again criticize chief minister eknath shinde svk 88 mrj
Show comments