राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला विश्वासात घेऊन आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे. आपल्याला सत्तेमध्ये जायचं आहे. आपल्या भागातील काम पूर्ण करायची असतील तर सत्तेत जाणं हा योग्य पर्याय वाटतो अस सांगितलं होतं. ही सर्व चर्चा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झाली. असं वक्तव्य मावळ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. त्यामुळे आम्ही स्टॅम्प पेपर वरती लिहून दिले असं त्यांनी म्हटलं आहे. ते तळेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सुनील शेळके म्हणाले, “अजित पवार यांच्या कार्यालयातून आम्हाला निरोप आले की आपल्याला मुंबईला सगळ्या आमदारांना एकत्रित भेटायचे आहे. भेटीच्या निमित्ताने काही चर्चा देखील करायची आहे. मग, आम्ही सर्वच विधिमंडळातील सहकारी अजित पवार यांना सकाळी दहा वाजल्यापासून भेटत होतो. भेटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या मतदारसंघातल्या अडचणी देखील सांगत होते. काहींनी काम होत नाहीये काही अडचणी निर्माण होत आहेत. या देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु, त्याचबरोबर आमच्याकडून अजित पवारांच्या बंगल्यामध्ये सह्या देखील घेतल्या जात होत्या.”
आणखी वाचा-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाबरोबर जाणार? निर्णय झाला, प्रशांत जगताप म्हणाले…
पुढे ते म्हणाले, “आम्हाला अजित पवार यांनी विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की, आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे. आपल्याला सत्तेमध्ये जायचं, आपापल्या भागातील काम जर पूर्ण करायचे असेल तर आपण सत्तेत जाणं हा आपल्यापुढे पर्याय योग्य वाटतो आणि सगळ्यांनी त्याला संमती दिली. प्रत्येकाने स्टॅम्प पेपर वरती लिहून दिलं. अजित पवार आणि शरद पवार पवार यांच्या सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये राहणार आहे. असही त्यांनी नमूद केले आहे. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादीत दोन गट नाहीत. काहीही सत्य नाही. आम्हा सर्वांचं दैवत आम्हा सर्वांचे नेते शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातील विधिमंडळातील आमदार हे देखील काम करतो आहोत. पुढे ते म्हणाले, आमचं एवढंच म्हणणं आहे. की, नागालँडमध्ये जसं भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही सहा सात आमदार निवडून आले होते त्यांना सत्तेमध्ये स्थान दिलं. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना स्थान मिळावं.”