पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित केलं आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यामध्ये वनाझ कॉर्नर ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट अशा दोन मार्गांवर पुणे मेट्रो कार्यान्वित होणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या विकासाचं नेतृत्व करतात. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत केली आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी स्तुतीसुमनं उधळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अजित पवार म्हणाले, “पुण्याच्या विकास कार्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला नेहमीच साथ दिली आहे. ते महाराष्ट्रातील विकासाला सहकार्य आणि प्रोत्साहन देत असतात. ते देशाच्या विकासाचं नेतृत्व करतात. आज आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यासाठी मी मोदींचे आभार मानतो.”

हेही वाचा- “दगडूशेठ पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर…”, नरेंद्र मोदींचं पुण्यात वक्तव्य

“मला आठवतंय पहिल्या टप्प्याचं नरेंद्र मोदींच्या शुभाहस्ते उद्घाटन झालं होतं. आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. पण पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे. ही सगळी कामं करत असताना पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना अनेक अडचणी येत असतात. पण ती सहनशीलता तुम्ही सगळ्यांनी दाखवली. अगदी करोना काळातही आपण कामामध्ये कुठेही विलंब होऊ दिला नाही, असाच प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्रात विकास गतीने व्हावा, यासाठी काम करत असतो. आता हे तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत करतच असतात”, असंही अजित पवार म्हणाले.