पिंपरी- चिंचवड : वाल्मिक कराड प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीला, कुणाच्याही दबावात यायचं नाही, निःपक्षपाती चौकशी करायची अशा सूचना दिल्या आहेत. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अभिनेता सैफअली खान प्रकरणीदेखील अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या चालवल्या असं अजित पवार म्हणाले. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आणखी वाचा-महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
अजित पवार म्हणाले, वाल्मिक कराड प्रकरणात कुणी काय आरोप केले आहेत. हे मला माहित नाही. CID, SIT यांच्यावर चौकशीची जबाबदारी आहे. अतिशय चांगल्या प्रकारे चौकशी करावी आणि कुणाच्याही दबावात येऊन नये अशा सूचना दिलेल्या आहेत. पुढे ते म्हणाले, वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात. ती माहिती दिल्यानंतर CID, SIT दखल घेऊन चौकशी करतील. अभिनेता सैफअली खानच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळली अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी माहिती न घेता चालवल्या. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी हा आमचा प्रयत्न असतो. पुढे ते म्हणाले, पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर आत कसा गेला?, नेमक चोरीच्या उद्देशाने गेला की त्यांच्यातील कुणी यात सहभागी होतं त्याचा तपास सुरु आहे.