“अधिकृत उमेदवार व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना मी सांगेल तो निर्णय घ्यावा लागेल ” असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी बंडखोरांना ताकीद दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवारांनी काही मिनिटं बंडखोर नाना काटे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळमध्येही तिढा निर्माण झाला आहे.याबद्दल काल चर्चा झाली आहे. अशा ठिकाणी सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल.उमेदवाराने ऐकलं नाही तर काही कठोर निर्णय घेणार असं अजित पवार यांनी सांगितलं. शिवतारे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता “मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. २० तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे. यावर मी उत्तर देणार नाही ” असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा… बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू

हे ही वाचा…. प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याच्या दोन घटना उघड; एक मुलगी अल्पवयीन

दरम्यान दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर मोघम उत्तर अजित पवारांनी दिलं. “आपल्याला दिसेल ” अशा दोन शब्दात उत्तर देत अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद आटोपता घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reaction on pawar family get together on occasion of diwali kjp 91 asj