आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली.

दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच नवीन जबाबदारी दिली नाही. पवारांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना पक्षात डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर अजित पवारांनी स्वत: प्रतिक्रिया दिली.

BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!
maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?
Anil Deshmukh
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर

कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची नियुक्ती करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. या निर्णयामुळे मी अतिशय समाधानी आहे. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय. मी प्रत्येकवेळी सांगत आलोय की, मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी नेहमी सांगतो की, राज्य पातळीवरचे प्रश्न मला विचारा आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न तुम्ही आमचे राष्ट्रीय प्रवक्ते किंवा राष्ट्रीय नेत्यांना विचारा… असं मी नेहमीच सांगत आलो आहे. यापुढेही मी हेच सांगेन.”

हेही वाचा- नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

“सुप्रिया सुळेंचा कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. मी अतिशय समाधानी आहे. आम्ही एक समिती गठीत केली होती. त्या समितीत १५ ते १७ लोक होते. त्यावेळी आम्ही दोन निर्णय घेतले होते. पहिला निर्णय म्हणजे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा. दुसरा निर्णय म्हणजे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची नियुक्ती करावी, हे मी स्वत: सुचवलं होतं,” असंही अजित पवार म्हणाले.