लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : राज्यातील विविध भागातील महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण, पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा शुक्रवारी तळेगावदाभाडे शहरात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने टाकण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील ९० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण मधील महिलांच्या खात्यावर शनिवारी (१७ ऑगस्ट) पैसे येणार आहेत. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या ज्या महिलांनी अद्यापही अर्ज भरले नाहीत. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत.

आणखी वाचा-पुणे : मंदिर परिसरातील अस्वच्छतेवरून अजित पवारांनी विश्वस्तांना कानउघडणी

महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्याने विरोधकांनी टीका केला. उच्च न्यायालयात जाऊन त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. आडकाठी निर्माण करत आहेत. टिंगलटवाळी करत आहेत. परंतु, महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पैसे काढून घेतले जाणार नाहीत. काही जण चुकीचे वक्तव्य करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे. महिलांनी आशिर्वाद दिले तर पुन्हा महायुतीचे सरकार येईल. सरकार आल्यानंतर पुढील पाच वर्षे ही योजना चालू ठेवली जाईल. पाच वर्षात एका महिलेच्या खात्यात ९० हजार रुपये जमा होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar reacts on when will money of ladki bahin yojana come to account of women in pune district pune print news ggy 03 mrj