पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांसह सरकारमध्ये आज सामील झाले. त्यांचा शपथविधीही झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. त्याग पवार यांनी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेऊन बंड केल्याचे संकेत दिले.
पवार म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. म्हणजे आतापर्यंतचे भ्रष्टाचाराचे केलेले आरोप चुकीचे होते. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला बैठक बोलावली होती. त्यात संघटनात्मक निर्णय घेणार होतो. मात्र आम्हीच पक्ष असल्याची भूमिका काहींनी मांडली. अन्य विधीमंडळ सदस्यांची भूमिका दोन तीन दिवसांत स्पष्ट होईल. जे काही घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला, तरी आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाणार आहोत. आमची खरी शक्ती कार्यकर्ते आहेत, मला महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असेही पवार यांनी सांगितले.