मागील काही दिवसांपासून राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा पेट या जागांच्या पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा-शिंदे गट तसेच महाविकास आघाडीकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. याच कारणामुळे येथे त्यांनी सभांचा धडका लावला आहे. आज (१३ फेब्रुवारी) त्यांनी चिंचवड येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी आपल्याला चिंचवड, कसबा पेट ही निवडणूक जिंकायची आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, अशी भावनिक साद घातली.

हेही वाचा >> अजित पवार शिंदे गटावर बरसले, जाहीर सभेत म्हणाले; “बाळासाहेबांनी सांगितलं, मग…”

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…

शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीतून बदला घ्यायचा आहे

“विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा आपल्या विचारांच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटाला त्यांना त्यांची जागा समजलेली आहे. मात्र आपल्यासाठी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, ज्या प्रकारे पायऊतार व्हावे लागले, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीतून घ्यायचा आहे. मी मागील ३० ते ३२ सालापासून काम करत आहे. याच शहराने मला १९९१ साली पहिल्यांदा खासदार केले होते,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> कल्याण लोकसभेत भाजपाचे मंत्री वारंवार का येतायत? शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले…

पानटपरीवाले, वाहनं चालवणारी माणसं खासदार, आमदार झाले

या सभेत त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत शिंदे गटावरही खरपूस शब्दांत टीका केली. तसेच आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा एकही आमदार, खासदार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. “शिवसेना कोणी काढली हे सर्वांनाच माहिती आहे. जे गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्हीही ते पाहिलेले आहे. पानटपरीवाले, वाहनं चालवणारी साधी-साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सगळं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले,” असे अजित पवार म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागुद्या. त्यांची काय अवस्था होईल ते समजेल, असा टोलादेखील अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला.