विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्तांतरणासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकाविरोध बंड पुकारलं. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील सत्तानाट्यानंतर २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी राजभवनामध्ये बंडखोर शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठींब्याने सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच संत्तांतरणासंदर्भात अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना मोठं विधान केलं.

नक्की वाचा >> ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये भाजपाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये, “दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो,” असा खुलासा केला होता. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी भाजपाचे १०५ आमदार असूनही ते सत्तेत नसल्याने सातत्याने सत्तेत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते असं म्हटलं आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

“भाजपाला १०५ आमदार निवडून आल्यानंतरही सरकार स्थापन करता आले नाही. मात्र, तरीही त्यांचे विविध मार्गांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोठी शक्ती कार्यरत होती. ती शक्ती पाठीशी होती म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी एवढे मोठे धाडस केले,” असे अजित पवार यांनी पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कामगारांचे निलंबन मागे घेण्यात आल्यासंदर्भात विचारलं असता, शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करणार, असे अजित पवार म्हणाले.

Story img Loader