पिंपरी : मला आमदार किंवा खासदार व्हायचे नसल्याने मी सध्यातरी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेतील देखील कोणतेही पद घेणार नाही. पक्ष वाढविण्यावर माझा भर राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवानंतर पार्थ शहरात फिरकत नव्हते. महाविकास आघाडीचे सरकार असताना केवळ आयुक्तांची भेट घेऊन ते जात होते. परंतु, लोकांमध्ये मिसळताना दिसले नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पार्थ यांनी पुन्हा पिंपरी- चिंचवड शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी : विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत होणार

सातत्याने शहरात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघ निवडला आहे का, निवडणूक लढविणार आहात का असे विचारले असता पार्थ पवार म्हणाले, की मला आमदार किंवा खासदार व्हायचे नसल्याने मी सध्यातरी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. संघटनेतील कोणतेही पद घेणार नाही. पक्ष वाढविण्यावर माझा भर आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात दोन आणि पुण्यात एक विधान परिषदेचा आमदार दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहरात विधान परिषदेची एक आमदारकी द्यावी, अशी शिफारस अजित पवार यांच्याकडे केली आहे. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar son parth will not contest any election aim to build party pune print news ggy 03 zws