पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुढील चार-पाच दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची धावपळ हाेत आहे. उद्घाटने, भूमीपूजन, लाेकार्पणाची घाईगडबड सुरू आहे. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा ब-यांच अंशी सुटलेला आहे. थाेडा फार बाकी आहे. ताे आम्ही लवकरच एकत्र बसून साेडवू. ज्यावेळेस सुटेल, त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले जाईल, असे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणूक जवळ येतात त्यावेळेस पक्षांतरे हाेतात. या पक्षातून त्या पक्षात लाेक जातात. मतदार संघात संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच दुस-या पक्षात प्रवेश केले जातात. प्रत्येकाला आमदार व्हायचे आहे, म्हणून ते पर्याय शाेधत असतात. निवडून येणारे उमेदवार जेव्हा नसतात. तेव्हा उमेदवार आयात करावे लागतात. आघाडी, युती किंवा तिसरी आघाडी असते. त्यावेळेस निवडून येण्याची क्षमता बघितली जाते. लाेकसभा निवडणुकीवेळी काही लाेकांना शब्द दिले हाेते. परंतू, ते शब्द आता बाजूला गेले. आणि तिथे दुस-या लाेकांना घेण्यात आले. अशा प्रकारच्या घटना राज्याच्या अनेक भागात आपण पाहत आहाेत. हे काही नवीन नाही. ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुस-यांकडून काही उमेदवार घ्यावे लागतात, आणि उमेदवारी जाहीर करावी लागते.

disciplined party bjp is on the verge of indiscipline
बेशिस्तीच्या वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
pune politics
भूतकाळाच्या चष्म्यातून…बेशिस्तीचे वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष
Devendra bhuyar
आपटीबार: राजकीय ऱ्हासाचा ‘भुयारी’ मार्ग
Sudhir mungantiwar marathi news
मुनगंटीवार म्हणाले, “जागा वाटपाबाबत महायुतीत एकमत…”
Dada Bhuse will benefit from internal dispute in Shiv Sena Thackeray group in Malegaon Outer Assembly Constituency
ठाकरे गटातील दुफळीचा दादा भुसेंना आधार
stock market Nifty Nifty Index investment
बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा
Pregnancy Tourism and The Aryans Of Ladakh Latest Marathi News
Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

हे ही वाचा… दीर्घकालीन करोना संसर्गाचे रहस्य अखेर उलगडले! केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांचे संशोधन

बारामतीतून मी लढावे, असा कार्यकत्यांचा आग्रह असला तरी मी तुमच्या मनातील उमेदवार देईल, असे सांगितले आहे. जुन्नर भागातील बिबट्या पकडण्यासाठी पुणे जिल्हा नियाेजन समितीच्या निधीतून अनेक पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. बिबट्यांना आवर घालण्यासाठी वनविभागाच्या नियमांच्या अधिन राहून जी खबरदारी घेता येईल, ती घेतली जाईल. काही बिबटे पकडून दुस-या राज्यात पाठविले आहेत. माणसाचा जीव महत्वाचा असून तो वाचविणे महत्वाचे आहे. अत्याचाराच्या घटना गंभीर असतात. बाेपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील आराेपींच्या मागावर पोलीस आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. आराेपींना लवकरात-लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा… सिंहगड रस्ता परिसरात बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, भागीदारासह तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड शहरात दरराेज पाणी देण्याची कार्यवाही चालली आहे. भामा आसखेड, आंद्रा, पवना धरणातून पाणी आणत आहाेत. परंतू, प्रचंड वेगाने शहर वाढत आहे. नवीन वसाहती वाढल्या असून तिथे पाण्याच्या समस्येसह विविध समस्या जाणवतात,असेही ते म्हणाले.