कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या महाराष्ट्रातील भूभागावर दावा करणाऱ्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत उत्तर दिले पाहिजे. एक इंचही जागा त्यांच्याकडे जाता कामा नये, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा आमदारांसह गुवाहाटीला जाऊन आता कोणाचा बळी देणार? अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा >>>पुणे: नवमतदारांच्या नोंदणीसाठी आज महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर
पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केले. सीमा प्रश्नावर पवार म्हणाले, की, राज्य सरकारने जत पंढरपूरकडे लक्ष दिले पाहिजे. तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. तेथील लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल, असे प्रयत्न सरकारने करणे आवश्यक आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचीही ही जबाबदारी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक उत्तर दिले पाहिजे. एक इंच पण जागा त्यांच्याकडे जाता कामा नये. बेळगाव, निपाणी या गावांचे विषय न्यायालयात आहेत. सरकारने हा प्रदेश महाराष्ट्रात कसा येईल, ते बघणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>>पुणे: करोना महासाथीनंतर रुग्ण चयापचयाच्या समस्यांनी त्रस्त; डॉ. जयश्री तोडकर यांची माहिती
मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना गुवाहाटी येथे घेऊन जाणार आहेत. तेथे देवीचे दर्शन घेणार असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, पवार म्हणाले, मला समजले आहे की, त्यांनी तेथील हॉटेल मालकाचे बिल दिले नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली. ही प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती. ते दर्शनाला चालले आहेत. तेथे रेडा बळी देतात. आता ते कोणाचा बळी द्यायला चाललेत. लोक नवस फेडायला जात असतात. दर्शनाला जाणार असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
हेही वाचा >>>पुणे: टपाल बचत खात्याचे घरबसल्या विवरण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान केले, तेव्हा व्यासपीठावर शरद पवार होते. त्यांनी तेव्हा काहीच भूमिका मांडली नाही, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र बंद करण्यासारखा निर्णय घ्यावा लागेल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर पवार म्हणाले, यावर मी सकारात्मक प्रतिसाद देतोकराड येथील कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत ते म्हणाले की, मला या कार्यक्रमाबद्दल आता समजले. मला आमंत्रण होते किंवा नव्हते, हे महत्त्वाचे नाही. अन्य खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी विरोधी पक्ष नेता आहे. पालकमंत्री म्हणून मी बैठका घेत होतो. भविष्यात पालकमंत्री म्हणून परत बसणार आहे.