राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यातील बाणेर भागातील अंत्यत विश्वासू सहकारी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षा चालकस मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात या घटनेची एकच चर्चा सुरू आहे. माझ्याकडून रिक्षा चालकास मारहाण झाली नसल्याची भूमिका या घटनेवर बाबुराव चांदेरे यांनी मांडली.
या घटने बाबत बाबुराव चांदेरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,सुस चौकात दुपारी जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.त्या ठिकाणी मी जवळपास तीन चार तास वाहतूक सुरळीत करण्याचे काम करित होतो.त्यावेळी एक रिक्षा चालक अचानक मध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता.तुझ्यामुळे आणखी वाहतूक कोडी होईल.तू तुझी गाडी मागे घे, थोड थांब थोड्या वेळाने जा असे त्याला सांगितले.त्यावर तो माझ्या सोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली.तसेच माझ्याकडून रिक्षा चालकास कोणत्याही प्रकाराची मारहाण झाली नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.