पिंपरी : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्ता स्थापन करताना आणि जुलै २०२३ मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम असलेले पिंपरीचे राष्ट्रवादीचे ( अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे आता अजितदादांवर नाराज झाले आहेत. तिसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्रिपद मिळेल असा विश्वास होता. परंतु, भ्रमनिरास झाला. त्यामुळे अधिवेशनात मनही लागत नव्हते असे आमदार बनसोडे यांनी अधिवेशन सोडून मतदारसंघात आल्यानंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमदार बनसोडे म्हणाले, यावेळेस मला मंत्रिपद मिळेल अशी माझी खूप अपेक्षा आणि इच्छा होती. मंत्रिपद न भेटल्याने नाराज नक्कीच आहे. मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. त्यामुळे यावेळेस अजित पवार हे मला मंत्रिपद देतील अशी माझी अपेक्षा होती. पण, दादांनी दिलेला विश्वास, शब्द ते नक्कीच पाळतील असा मला विश्वास आहे. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण न झाल्याने अधिवेशनात मन लागत नव्हते. लोकांच्या कामांसाठी मतदारसंघात आलो आहे. अजितदादा माझा नक्कीच पुन्हा एकदा विचार करतील असा माझा विश्वास आहे. यावेळी भ्रमनिरास झाला आहे. यापुढे जनतेची अधिक जोमाने कामे करणार आहे. त्यानंतर तरी मंत्रिपद मिळेल. घरी दुःखद घटना घडल्याने अधिवेशन सोडून मी तातडीने मतदारसंघात आलो आहे. अजित पवार यांच्याशी बोलूनच मतदारसंघात आलो असल्याचेही बनसोडे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा… पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, औद्याेगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला आत्तापर्यंत एकदाही कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. आत्तापर्यंत शहरातील पाच जणांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले, मात्र शहराच्या ४० वर्षाच्या इतिहासात एकदाही कॅबिनेट, राज्यमंत्रिपद मिळाले नाही. मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेले आणि तीनवेळा निवडून आलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे यांच्या पदरी निराशा पडली आहे.

महायुतीचे शहरात पाच आमदार

भाजपचे दाेन विधानसभा, दाेन विधान परिषद आणि राष्ट्रवादीचे एक विधानसभा असे महायुतीचे पाच आमदार आहेत. त्यामुळे शहरात महायुतीची ताकद वाढली आहे. आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला राज्यमंत्रिपद तरी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.