पुणे प्रतिनिधी: हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक २०२३ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा एक गट करून उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले.त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जात शिंदे फडणवीस सरकारची स्थापन केली. त्या घटनेला आठ महिन्याचा कालावधी होऊन गेला.मात्र या दरम्यान शिंदे गटातील आमदार आणि खासदारावर ठाकरे गटातील नेतेमंडळी दररोज टीका करण्याची एक ही संधी सोडत नाही. आता त्याच दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू या नेत्यांना नागरिक अडवून तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडले, गद्दारी का केली. असा जाब विचारतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

आणखी वाचा- रवींद्र धंगेकर ‘त्या’ समाजातील दुसरे आमदार निवडून आलेत: अजित पवार

त्याच घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यातील कार्यकर्त्यांच्या धागा पकडत म्हणाले की, “महाविकास आघाडीच सरकार गेल.त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सोडून काही आमदार दुसर्‍या बाजूला गेले आहेत. त्या खासदार, आमदारांना ८५ वर्षाचे नागरिक थांबवून जाब विचारत आहेत. सर्व सामान्य नागरिकांच्या मनामध्ये एकदा की गेल की,ते कोणाच्याही हातामध्ये राहत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी चूक केल्या आहेत. ते लोक आता अनुभव घेत आहेत.” अशा शब्दात शिंदे गटातील आमदारांना त्यांनी टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar talk about 40 mla who left uddhav thackrey and join eknath shinde svk 88 mrj
Show comments