पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घटन करण्यात आलं. यावेळी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी जमली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकार गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच समोर करोनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचं दिसून आलं. यावेळी अजित पवारांनी बोलताना गर्दीवर आपली खंत बोलून दाखवली. “इतका दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत. त्याची मनात खंत वाटते”, अशा शब्दांत अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली.
…म्हणून मनात खंत वाटते!
या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. खुद्द अजित पवार यांनीच केलेलं गर्दी न करण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दृष्टीआड केलं. त्यामुळे आता अजित पवार आणि राज्य सरकारवरच टीका होऊ लागली आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “गाडीतून उतरत असताना उदघाटन न करता निघून जावं असा विचार आला होता. मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असता. पण आजच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत, त्यामुळे मनात खंत वाटते”.
….’त्या’ पुणेकरांना १५ दिवस क्वारंटाइन करणार; संतापलेल्या अजित पवारांचा इशारा
सरकारचं आवाहन फक्त नागरिकांनाच लागू का?
करोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी गर्दी करता कामा नये, सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रत्येक वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करताना दिसत आहेत. आज दुपारी देखील पत्रकार परिषदेत नागरिकांना गर्दी करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. पण तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
“ज्यांना काही उद्योग नाहीत…,” निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर
दरम्यान, कार्यक्रम झाल्यानंतर गर्दीविषयी अजित पवारांना विचारणा केली गेली. त्यावेळी. “कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक करावाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.