राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवार सकाळी पिंपरी-चिंचवड येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. मुख्यम्हणजे, शहराचे नेतृत्व करणारे अजित पवार हे आज सकाळी शहरात येणार असल्याची पूर्वकल्पना महापालिकेचे अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांना होती. मात्र शहरात कोणकोणत्या ठिकाणी भेट देणार हे ‘दादां’नी गुपीत ठेवले होते. त्यामुळे अजितदादांच्या या दौऱयात त्यांच्या मागे धावताना महापालिका अधिकाऱयांची चांगलीच दमछाक झाली.
अजित पवारांनी आकुर्डी येथील गणेश तलावाला प्रथम भेट दिली. त्यानंतर साने चौक, कुदळवाडी, केएसबी चौक, लांडेवाडी, पवना नदी अशा शहरातील विविध भागांची अजितदादांनी पाहणी करून अधिकाऱयांना संबंधित सुचना केल्या.

Story img Loader