पुणे : गणरायाचे आगमन होऊन सात दिवस झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहरातील अन्य प्रमुख मंडळाना भेट दिली.
हेही वाचा – गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक
तुम्ही गणरायाकडे काय मागितले? यावर अजित पवार म्हणाले की, तुला संपादक कर म्हणून गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत अद्यापही पाऊस झाला नाही, त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडू दे. पाऊस झाल्यावर बळीराजा सुखी झाला की वातावरण बदलून जाते. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.