पुणे : मागील १८ तासांपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले.
अजित पवार यांचे काल पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण काल अचानक दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. त्याबाबतचे कारण समोर न आल्याने अजित पवार हे नेमके कुठे गेले? हे कोणाला समजले नाही. त्यानंतर आजदेखील आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मागील १८ तासांपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत पुण्यातील खराडी भागातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिसून आले.
हेही वाचा – पुणे : रिझर्व्ह बँकेचा बँकांसह वित्तीय कंपन्यांना दणका
नॉट रिचेबलमुळे विविध चर्चांना उधान
अजित पवार नॉट रिचेबल असल्याने विविध चर्चांना उधान आले होते. त्यातच आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूच ट्विट केलं होतं. त्यामुळे चर्चांना आणखी उधान आले. अजित पवार सकाळी पुण्यात होते. त्यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा होत्या. आता अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात दिसून आल्याने ते या प्रकरणावर काय भूमिका मांडतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे अंजली दमानिया यांचं ट्वीट?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्विट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं.
अजित पवार यांच्यासह नॉट रिचेबल असलेले सात आमदार कोण? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बंड होणार का? अशा सगळ्या चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.
हेही वाचा – पुणे : विमानतळावरील ‘डिजियात्रा’ची असून अडचण नसून खोळंबा !
अंजली दमानिया यांच्याप्रमाणे इतर अनेकांनी अजित पवार नॉट रिचेबल, अशी ट्विट केली आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी अजित पवारांचा उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभं राहून डोळा मारतानाचा व्हिडीओही ट्वीट केला आहे.