पुणे : राजकीय भवितव्य पणाला लागलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात आठ जागा जिंकून आपणच जिल्ह्याचा कारभारी असल्याचे दाखवून दिले आहे. अनेकदा रागात बोलणारे, ‘बघून घेतो’ अशी जाहीरपणे दमबाजी करणारे, एखादा शब्द चुकीचा वापरून वादात सापडणारे अजित पवार यांनी भाजपच्या संगतीत आल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात प्रचार करताना प्रचारशैलीत कमालीचा बदल केला होता. कोणतेही वादग्रस्त विधान न करता आणि वैयक्तिक टीका-टिप्पणी टाळून ‘विकास’ या मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळे मतदारांनी त्यांना साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्र्रवादी (शरद पवार) या दोन पक्षांच्या वर्चस्वाचा प्रश्न होता. त्यात अजित पवार यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होते. त्यामुळे अजित पवार यांनी या वेळच्या निवडणुकीत नियोजनबद्ध प्रचार केल्याचे दिसून आले. विशेषत: बारामतीत प्रचार करताना त्यांनी विकासावरच भर दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी ते आदराने बोलत राहिले. कुटुंबातील सदस्यांवरही शेलक्या शब्दांत नाराजी व्यक्त करत राहिले. त्यामुळे त्यांची रागीट ही प्रतिमा प्रचाराच्या काळात बाजूला पडली. शिवाय ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून त्यांना महिला मतदारांकडूनही प्रतिसाद मिळाला.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा-छळामुळे महिलेची आत्महत्या, पतीविरुद्ध गुन्हा

जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी मावळ आणि पुरंदरवगळता बारामती, इंदापूर, भोर, आंबेगाव, शिरूर आणि खेड-आळंदी या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन ‘राष्ट्रवादी’मध्ये थेट लढती होत्या. त्यामध्ये एकाही ठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला यश मिळाले नाही. मावळमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा न करता अपक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र, त्या ठिकाणीही ते अपयशी ठरले.

बारामतीतून अजित पवार, आंबेगावमधून दिलीप वळसे, इंदापूरमध्ये दत्ता भरणे, भोरमध्ये शंकर मांडेकर, शिरूरमध्ये माऊली कटके, मावळमधून सुनील शेळके असे सहा जण जिल्ह्यातून विजयी झाले, तर पुणे शहरात हडपसरमधून चेतन तुपे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे दोन्ही आमदार सलग दुसऱ्यांना निवडून आले.

आणखी वाचा-नो एंट्रीतून येणाऱ्या मोटारचालकाची मुजोरी; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

मैत्रीपूर्ण लढतीत अपयश

अजित पवार यांनी पुरंदर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या ठिकाणी ते अपयशी ठरले. शिवतारे विजयी झाले, तर झेंडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

खेड-आळंदीत पराभव

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला जिल्ह्यात दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला. खेड-आळंदीमध्ये दिलीप मोहिते पराभूत झाले. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे हे विजयी झाले. जुन्नरमध्ये अतुल बेनके हे यशस्वी होऊ शकले नाहीत. या मतदारसंघात मनसेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवून ते विजयी झाले.

Story img Loader