बारामती : – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्न बंधना मध्ये बांधले जाणार आहेत, जय पवार यांचा विवाह ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे, याबाबतची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यम प्रतिनिधीना बोलताना दिली.
लवकरच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा होणार आहे, याचे निमंत्रण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना देण्यात आलेले आहे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच समाज माध्यमावर या बाबतचे फोटो प्रसिद्ध केले आहेत,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांना भेटी प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या दोघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत,
जय पवार यांनी आपल्या होणाऱ्या भावी पत्नी ऋतुजा पाटील यांच्या सह खासदार शरद पवार यांची भेट घेतली, यावेळी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भगिनी आणि वहिनी या वेळी उपस्थित होत्या, पवार कुटुंबीयांनी या नवीन जोडप्यांचे औक्षण करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, याबाबतचे फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुक समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले आहेत,
हा सोहळा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर लोकांना आकर्षित करणारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते आहेत, त्यांच्या कुटुंबातील या महत्त्वाच्या क्षणाला राज्यातील अनेक राजकीय जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, या विवाह लग्नाच्या सोहळ्यातून राजकीय संबंधाची नवी पातळी निर्माण होण्याची शक्यता आहे,
दरम्यान,खासदार सुप्रिया सुळे यांनी होळी आणि रंगपंचमीच्या सणाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या आहेत,आपण सुरक्षित रहा, धमाल करा, आपली सुरक्षितता विसरू नका , कारण आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे, असा सल्ला सुद्धा सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील पक्षात नाराज आहेत.? या बाबत विरोधक बोलताना दिसत आहेत, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रत्येकांनाच ते हवाहवासे वाटतात, किती भाग्यता आहे, जयंत पाटलांनंसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत, विरोधक नेहमीच आमच्या बाबत बोलत राहणार,त्यांना बोलू द्या, “बुरा ना मानो होली है,” नेमकं होळीच्या दिवशीच ते सर्व बोलले आहेत,बुरा ना मानो होली है..! त्यात काय वाईट वाटून घ्यायचं, असे ही सुप्रिया सुळे या वेळी बोलताना म्हणाल्या.