शरद पवार पंतप्रधान होणार नाहीत. कारण पंतप्रधान होण्यासाठी लागणारी ‘मॅजिक फिगर’ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नाही, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोणत्याही कार्यकर्त्याने यापुढे शरद पवारांचे नाव पंतप्रधानपदाच्या संदर्भात घ्यायचे नाही, असा इशाराच देऊन टाकला.
पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पंतप्रधानपदाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पंतप्रधानपद मिळवण्यासाठी लागणारी मॅजिक फिगर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नाही. याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार नाहीत. शरद पवार आत्ता ७४ वर्षांचे आहेत आणि ते पुढच्या सहा वर्षांसाठी राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी यापुढे त्यांच्या नावाच्या संदर्भात पंतप्रधान असा उल्लेख करायचा नाही.

Story img Loader