पुणे: पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरात आले आहेत. अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या गणेशोत्सव देखावे आणि गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण होणार आहे. अजित पवार यांनी वेळेत उपस्थिती लावत कार्यक्रमाला हजर झाले पण निगडीत ग.दि.मा नाट्यगृह निम्मे रिकामे होते. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नाना काटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पिंपरी- चिंचवड दौरा आहे. त्यांनी वाकड, हिंजवडी येथील खासगी कार्यक्रमाला हजेरी लावून फिती कापल्या. मग, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहिले. पण, यावेळी कार्यक्रमस्थळी ८०० आसन क्षमता असलेले ग.दि.मा नाट्यगृह हे निम्मे रिकामे बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या स्पर्धेत शेकडो मंडळांनी सहभाग नोंदवला पण बक्षीस वितरण समारंभास मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे. एकीकडे पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. तर दुसरीकडे नाट्यगृह निम्मे रिकामे असल्याचं निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलिस देखील हजर होते, तगडा बंदोबस्त होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawars program in pimpri chinchwad left the theatre half empty kjp 91 mrj
Show comments