पुणे : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात कमाल – किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी अकोल्यात सर्वांधिक ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> धुळवड साजरी करताना बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्या शिवाय अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे ४०.० किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने तापमानात वाढ होण्याचा अंदाज या पूर्वीच दिला होता. तसेच पुढील तीन ते चार दिवस ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक, काय होणार बैठकीत?

किनारपट्टीवरही उष्णतेच्या झळा ?

राजस्थान आणि गुजरातमधील आद्रतायुक्त उष्ण वारे गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरून मध्य महाराष्ट्रापर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत किनारपट्टीवर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हर्णे येथे २४.६ तर बुलढाणा येथे २४.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यासह राज्यात किमान तापमान सरासरी २० ते २२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे राज्यभरात रात्री आणि पहाटेही उकाडा जाणवत आहे.

कमाल तापमानात आणखी वाढ ?

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेच्या झळा पुढील चार दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान संशोधन आणि सेवा विभाग, पुणे येथील प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola registers highest temperature in maharashtra pune print news dbj 20 zws