पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिणारे खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी प्रसृत केला. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (७ मे) होत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची या पदावरून उचलबांगडी करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी कट्यारे यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी सारथी संस्थेचे उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांची नियुक्ती केली आहे.
खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा निवडणुकीचा पदभार काढला
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी प्रसृत केला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 04-06-2024 at 00:47 IST | © The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alandi assembly constituency assistant election officer jogendra katyare removed from post pune print news psg 17 zws