पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सरकारी साक्षी, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचा अर्ज ‘सीबीआय’ने न्यायालयात सादर केला. सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बुधवारी (१३ सप्टेंबर) अर्ज सादर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकार पक्षाकडून नोंदविण्यात आलेल्या साक्ष, तसेच पुरावे सादर करण्याचे कामकाज संपले आहे, असे सीबीआयचे वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले.  डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुढील टप्प्यात आरोपींचे जबाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येणार आहेत. खटल्याची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सीबीआयने मुख्य आरोपपत्रासह पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All evidence submitted in dr narendra dabholkar murder case application of cbi in court ysh