लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य सरकारची पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अमरावती या महसूल विभागांच्या ठिकाणी भाड्याच्या जागेत कोणतीही सरकारी कार्यालये नसावीत, असे सरकारचे मत झाले आहे. महाराष्ट्र राज्य वेगळे होऊन बरीच वर्षे झाली. प्रशासकीय कामकाज वाढले असून बदलत्या परिस्थितीनुसार कामाचा आणखी व्याप वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये सरकारी आणि हक्काच्या जागेत प्रशस्त असावीत, असे सत्तेतील तिन्ही पक्षांचे मत झाले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
The Supreme Court ruling on taking over private property
खासगी मालमत्ता ताब्यात घेण्यावर अंकुश; सर्व भौतिक संसधाने समुदायांच्या मालकीची नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

आणखी वाचा-ललित पाटील प्रकरण : ड्रग्स माफियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दौऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कृषी, कामगार, सहकार, शालेय शिक्षण भवन, सारथी आणि इतर विभागांच्या इमारती चांगल्या आणि सरकारी जागेत असाव्यात, असे ठरविण्यात आले आहे. या कामांना सुरुवात झाली आहेत. आगामी काळात या विभागांचा विस्तार झाल्यास त्यासाठी जागा कमी पडू नये, म्हणून पुढील ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून ही कार्यालये उभारण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे वित्त आणि नियोजन ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही, नियोजित वेळेत इमारतींची कामे पूर्ण होतील. आर्थिक राजधानी मुंबईपासून उपराजधानी असलेल्या नागपूरसह पुणे, नाशिक, अमरावती, छ. संभाजीनगर आणि इतर ठिकाणच्या सर्व ठिकाणी असणाऱ्या इमारतींच्या बांधकांमांच्या प्रशासकीय मुंजूऱ्या देऊन कामांना सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी आराखडे तयार करण्यात आले असून लवकरच त्यांना मान्यता देण्यात येईल. मुंबईमध्ये एअर इंडियाची इमारत सरकार घेत आहे. वरळीत जीएसटी भवन म्हणून मोठी इमारत होत आहे. पाऊणे दोन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, सागरी किनारा (कोस्टल) रस्ता ही कामेही सुरू आहेत.’