पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ रविवारी (१६ एप्रिल) सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी साडेपाच वाजता जंगलीमहाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आम आदमी पार्टीचे विजय कुंभार, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांच्यासह पुण्यातील सर्वपक्षीय स्थानिक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader