आम्हाला प्रस्थानाला जायचं होतं…

आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी मंदिराच्या बाहेर काही वारकरी तरुण आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. यावरून आता चांगलंच राजकारण रंगत आहे. यादरम्यानच, मारहाण झालेल्या वारकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वीस पोलिसांनी चार जणांना मारहाण केल्याचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून वारकरी विशाल यांनी केला आहे. नेमकं पोलिसांनी आम्हाला का? मारहाण केली या प्रश्नाचे उत्तर पोलिस अधिकार्‍यांनी द्यावं असं देखील विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिराच्या बाहेर अचानक पोलिसांच्या दिशेने बॅरिगेट्स तोडून तरुण वारकऱ्यांचा घोळका धावत आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी लाठीचा वापर केला. वारकरी आणि पोलिस समोरासमोर आले होते. त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी वारकऱ्यांना धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. काही तरुण वारकऱ्यांना एकांतात नेऊन त्यांना महाराण केल्याचा आरोप विशाल पाटील या वारकऱ्याने केला आहे. विशाल रावसाहेब पाटील म्हणाले, मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. आमचं म्हणणं होतं की आम्हाला प्रस्थान सोहळ्याला सोडा, ते दरवर्षी सोडतात. पण, अचानक ठरलं की आम्हाला आत सोडायच नाही. आम्हा चार विद्यार्थ्यांना वीस पोलिसांनी मारहाण केली. एकांतात घरात नेऊन मारलं आहे. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवर हात उचलू शकतात. पोलिसांनी मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं. असेही विशाल म्हणाले आहेत.