पुणे : सिंहगड रस्ता भागात शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. मुलाने दिलेल्या माहितीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल परिसरात युवासेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे यांचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या परिसरात दोन मुले थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मुलावर गोळीबार केला. पिस्तुलातून गोळीबार झाल्यानंतर मुलगा वाकल्याने तो बचावला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.

pimpri chinchwad vidhan sabha election
पिंपरी- चिंचवड मधील आमदारांना मंत्री पदाचे वेध; मंत्री पद एक, दावेदार तीन…तिघांमध्ये रस्सीखेच सुरू
College student robbed on Hanuman Hill
पुणे : हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन तरुणाला लुटले
Blood stains on wood in cemetery Murder case revealed
पुणे : स्मशानभूमीतील लाकडावर रक्ताचे डाग; खुनाच्या गुन्ह्याला वाचा
woman dies after being hit by PMP bus on Satara road
सातारा रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू, अपघातात मुलगी जखमी
Afghanistan garlic imported
पुणे : अफगाणिस्तानातील लसूण बाजारात, उच्चांकी दरामुळे लसणाची आयात
Diljit Dosanjh concert kothrud pune
चंद्रकांतदादांनी विरोध करूनही त्यांच्याच मतदारसंघात दिलजीत दोसांझचा कार्यक्रम झाला अन् …
Pune Drugs, pistol seized Katraj, Katraj,
पुणे : तडीपार गुंडाकडून पिस्तुलासह अमली पदार्थ जप्त, कात्रज भागात कारवाई
Mahayuti aims to conduct stalled local self government elections following its success in this election
महायुती तुटणार, प्रत्येक पक्ष आता स्वतंत्र लढणार ? सहा महिन्यांत निवडणुकांची शक्यता

हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलाने गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. पुंगळी न सापडल्याने पोलिसांनी मुलाने दिलेल्या माहितीवर साशंकता व्यक्त केली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.