पुणे : इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही वाद नाहीत. गुणवत्ता हाच तिकिट आणि जागा वाटपाचा एकमेव निकष आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वास काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे व्यक्त केला. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. काँग्रेस विचारधारा आहे. व्यक्तीकेंद्रित पक्ष नाही. त्यामुळे गटबाजी असण्याचा प्रश्नच नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठक रविवारी झाली. या बैठकीपूर्वी पटोले यांनी पत्रकार परिषद झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, विश्‍वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच इंडिया आघाडीचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.आढावा बैठकीवेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अनुपस्थित होते. त्यामुळे पक्षात गटबाजी आहे का, अशी विचारणा केली असताना त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. पुण्यातील परिस्थिती बदलली आहे. सध्याची परिस्थिती काय आहे, याचा विचार करूनच पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निर्णय घेण्यात येईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
odi’s call for consolidation was aimed at addressing the BJP’s growing challenge in Dhule City.
Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा >>>सासरच्या छळामुळे उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

पटोले म्हणाले की, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांवर होत असलेला अन्यायामुळे जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. कसबा निवडणुकीतून हे दिसून आले आहे. राज्यातील सरकारच्या कथनी आणि करणी मध्ये फरक आहे. राज्यातील सरकार घटनाबाह्य आणि स्वार्थी विचारांचे आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सरकारविरोधात ताशेरे ओढले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. त्यामुळे या घटनाबाह्य सरकारच्या विरोधातील बाजू जनतेपुढे मांडणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करून भाजपला सत्तेबाहेर काढणे हा एकमेव उद्देश आहे.

प्रस्तावानंतरच निर्णय

वंचित बहुजन विकास आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत त्यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याचा विचार करून कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. जातीनिहाय जनगणनासंदर्भात केंद्र सरकारनेच पुढाकर घेऊन ती केली पाहिजे. तरच महिला आरक्षण लागू होऊ शकते, असेही पटोले यांनी सांगितले.