पुणे: पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येतील वाढ गुरुवारी कायम राहिली. या मार्गावर गुरुवारी रात्री सातपर्यंत सुमारे २८ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधीच्या तुलनेत मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल सहापट वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रोची विस्तारित सेवा १ ऑगस्टला सायंकाळी पाचला सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग आता सुरू झाला आहे. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. मेट्रोतून १ ऑगस्टला एकूण १२ हजार ९१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्याचबरोबर बुधवारी (ता. २) ३० हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोतून गुरुवारी रात्री सातपर्यंत २८ हजार ६९८ प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

आणखी वाचा-प्रवाशांसाठी खूषखबर! पुण्यात मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत शेअर रिक्षा

मेट्रोचे आधी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी हे मार्ग सुरू होते. मेट्रो सेवा मागील वर्षी ६ मार्चला सुरू झाली. ती सुरू झाल्यानंतर वर्षभरात दोन्ही मार्गांवर एकूण १९ लाख ७८ हजार १६० प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे वर्षभरातील मेट्रोची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पाच हजार होती. आता विस्तारित सेवेनंतर दैनंदिन प्रवासी संख्येने सहापट म्हणजेच ३० हजारांचा आकडा गाठला आहे. परंतु, सुरुवातीच्या काही दिवस दिसणारी प्रवासी संख्या पुढील काळात कायम राहणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

प्रमुख पाच स्थानकांवरील प्रवासी (गुरुवारी रात्री ७ वाजेपर्यंत)

  • रुबी हॉल : ३३६१
  • वनाझ : ३२५३
  • पिंपरी : २९०४
  • जिल्हा न्यायालय : २३६५
  • शिवाजीनगर : २१५६
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almost six times increase in the number of passengers pune metro pune print news stj 05 mrj
Show comments