मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने केलेले फेरबदल बेकायदेशीर असून ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे केली आहे.
खासदार गजानन बाबर, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांच्यासह ३५० जणांनी फेरबदलास हरकत घेतली आहे. निवासी स्वरूपाच्या भूखंडांचे वितरण करण्याचे काम असताना प्राधिकरणाकडून प्रकल्पउभारणीचे काम सुरू आहे. वास्तविक त्यासाठी राज्यशासनाने एमआयडीसीची स्थापना केली आहे. मोशीतील प्रदर्शन केंद्राची उभारणी एमआयडीसीनेच करणे उचित आहे. मूळ शेतक ऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत अनास्था दाखवणारे व भूखंड उपलब्ध नाही, असे कारण सांगणाऱ्या प्राधिकरणाची कृती न्यायतत्त्वाच्या विरोधात आहे. प्रकल्पाच्या जागेतून पेट्रोलियम पाइपलाइन जात असून तेथे दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याचा धोका नाकारता येत नाही, असे मुद्दे नगरसेविका सीमा सावळे यांनी डॉ. म्हसे यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा